About Vanvisava Resort , Amba

Vanvisava Resort , Amba Ghat

स्वप्नात घेऊन जाणारं आंबा गाव...
Welcome to Vanvisava Resort Amba
कोल्हापूर-कोकणाला जोडणारा शिवकाळातील प्रसिद्ध मार्ग... आंबा ! समुद्रसपाटीपासून ३१०० फुट उंचीवर असलेलं निसर्गानं नखशिखांत नटलेलं महाराष्ट्राचं गौरवशाली पर्यटनस्थळ म्हणून आज आंबा प्रसिद्ध आहे...! करवीरनगरी कोल्हापूर व रत्नागिरीपासून जवळ असणारे आंबा आज एक सुंदर हिल स्टेशन म्हणून पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. याच आंबा गावामध्ये साकारणार्‍या वनविसावा रिसॉर्ट्च्या आजूबाजूचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे तसेच विविध निसर्गरम्य स्थळांनी नटलेला आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं आंब्याचं खरं वैभव खुलतं ते पावसाळ्यामध्ये. ढगांच्या कुशीत पहुडलेला चिंब चिंब अंगाने मोहरून निघालेला इथला निसर्ग आपल्याला घेऊन जातो एका अनोख्या विश्‍वात... इथे खोल दर्‍यांमधून धुक्यांचे ढग वार्‍यासवे प्रवास करताना पाहून मन थक्क होते. पावसाळ्यातील शुभ्र कोसळणारे धबधबे... थंडीत असते धुक्याची मऊशार गादी... उन्हाळ्यात तर प्रत्येक झुडुप रानमेव्यांनी भरलेलं... इथे प्रत्येक ऋतू हवाहवासा वाटणारा... ! आंबा जंगल हे दुर्मिळ वनस्पती व वन्यप्राण्यांनी समृद्ध असून तिथे गवा, बिबट्या, वाघ, सांबर, रानडुक्कर, ससा, मोर असे वन्यप्राणी पहावयास मिळतात. इथे जंगलसफारी म्हणजे अद्भुत व थरारक अनुभवारची सुंदर पर्वणीच. भविष्यात जैविक विविधतेने समृद्ध असलेले आंबा जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश होण्याच्या मार्गावर आहे. आंबा गाव हे आणखी एका कारणामुळे भारतात प्रसिद्ध होत आहे, ते म्हणजे इथल्या चहाच्या बागा... महाराष्ट्रामध्ये अशक्यप्राय वाटणार्‍या चहाच्या बागांचा प्रयोग आंबा येथे यशस्वी झाला असून तिथे रेशीम उद्योग, टनेल फॅक्टरी यांसारखे विविध उद्योग नावारूपाला येत आहेत. त्यामुळे आंबा हे आता व्यावसायिक दृष्ट्याही महत्वाचे ठिकाण होईल याबद्दल शंका नाही...
आंब्यामध्ये अनेक अविस्मरणीय पर्यटन स्थळे असून, आपल्या वनविसाव्यापासून जवळच मानोली धरण व गेळवडे धरणाचे अथांग पसरलेले बॅक वॉटर हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण आहे. तसेच कोकण दर्शन पॉईंट, वाघाचा झरा, सतीचा मळा अशी निसर्गाने नटलेली ठिकाणे आहेत की ज्यांचं सौंदर्य नजरेत सामावून घेण्यात आपणच कमी पडू. आंबा परिसराला नैसर्गिकतेसोबत खूप मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमीही लाभली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विशाळगड आपल्याला मोहून टाकल्याशिवाय राहात नाही. बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्याची व बलिदानाची गाथा सांगणारा पावनखिंडही इथेच आहे. म्हणून आंबा येथील सहल ही नक्कीच सर्वांगाने परिपूर्ण व अविस्मरणीय होऊन जाते...

Tour Information

हे आगळे-वेगळे रिसॉर्ट आहे तरी कुठे ?

इतिहासात अमर पावलेल्या लढवय्या बाजीप्रभुंच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या पावनखिंड आणि प्रसिद्ध विशाळगडापासून अगदी जवळच निसर्गाने वेढलेल्या विहंगम परिसरामध्ये वनविसावा फॅमिली रिसॉट, आंबा येथे वसलेले आहे. छोट्या-मोठ्या जलशयांनी, गर्द झाडे झुडपांनी आणि विविध जंगली जीवसृष्टीने वेढलेल्या या कसल्याही प्रकारच्या प्रदुषणांपासून मुक्त या रिसॉर्टमध्ये आपले मनस्वी स्वागत. आपल्या सोबत मार्गदर्शक नकाशा असल्यास केवळ काही तासांच्या अंतरावर आपण इथे पोहचू शकता. मुंबई पासून फक्त ७ तास, पुणे-सोलापूर-पणजी पासून ४ तास आणि सांगली-बेळगाव पासून साधारणपणे २ तासात आपण शहरी कोलाहलापासून मुक्त होऊन निसर्गाच्या बाहूपाशात रममाण होऊ शकता. समाधानाने परिपूर्ण अशी सुट्टी उपभोगण्याचा आणखी कोणता दुसरा मार्ग असू शकतो ?

आंबा येथील हवामान

उन्हाळयात देखील येथील वातावरण आल्हाददायक भेटते. संपूर्ण परिसर हा हरित डोंगरमाथ्यांनी व्यापलेला व पाण्याचे लहान, मोठ्या तळ्यांनी भरलेला त्यामुळे तापमान हे अतिशय सुसह्य असे. जंगल भटकंतीमुळे गर्मी वाटत असल्यास वाटेत भेटणार्‍या जलशयात डुंबण्याचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. पूर्णतः सुरक्षित या परिसरामध्ये तुम्ही निसर्गाचा आल्हाददायक आनंद घेऊन, ताजेतवान होऊन पुन्हा आपल्या आयुष्यात मार्गस्थ होऊ शकतात.


इथे तुम्ही काय पहाल ?

"जंगलातला एक दिवस" हा अनोखा अनुभव देणारी एकदिवसीय जंगल पिकनिक. प्रसन्न सकाळी गरमा गरम नाश्ता घेऊन सूर्य मावळती पर्यंत कधी उघड्या जीपमधून, कधी पायी तर काही वेळा वाहनांच्या टपावर बसून निसर्गाचा आस्वाद देणारा जंगलमय दिन. आंबा जंगल हे दुर्मिळ वनस्पती व वन्यप्राण्यांनी समृद्ध असून तिथे गवा, बिबट्या, वाघ, सांबर, रानडुक्कर, ससा, मोर असे वन्यप्राणी पहावयास मिळतात. इथली जंगलसफारी म्हणजे अद्भुत व थरारक अनुभव देणारी सुंदर पर्वणीच.
आंबा गाव हे आणखी एका कारणामुळे भारतात प्रसिद्ध होत आहे, ते म्हणजे इथल्या चहाच्या बागा... महाराष्ट्रामध्ये अशक्यप्राय वाटणार्‍या चहाच्या बागांचा प्रयोग आंबा येथे यशस्वी झाला आहे.
आंब्यामध्ये अनेक अविस्मरणीय पर्यटन स्थळे असून, आपल्या वनविसाव्यापासून जवळच मानोली धरण व गेळवडे धरणाचे अथांग पसरलेले बॅक वॉटर हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण आहे. तसेच कोकण दर्शन पॉईंट, वाघाचा झरा, सतीचा मळा अशी निसर्गाने नटलेली ठिकाणे आहेत की ज्यांचं सौंदर्य नजरेत सामावून घेण्यात आपणच कमी पडू. आंबा परिसराला नैसर्गिकतेसोबत खूप मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमीही लाभली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विशाळगड आपल्याला मोहून टाकल्याशिवाय राहात नाही. बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्याची व बलिदानाची गाथा सांगणारी पावनखिंडही इथेच आहे. तिथल्या त्या पावनभुमीत नतमस्तक व्हायचं आणि तो घोर रणसंग्राम आठवत आपल्या राष्ट्र भावना जागवत जंगलात पुढे कूच करायची. इथे खोल दर्‍यांमधून धुक्यांचे ढग वार्‍यांसोबत प्रवास करताना पाहून मन थक्क होते. पावसाळ्यातील शुभ्र कोसळणारे धबधबे... थंडीत असते धुक्याची मऊशार गादी... उन्हाळ्यात तर प्रत्येक झुडुप रानमेव्यांनी भरलेलं... इथे प्रत्येक ऋतू हवाहवासा वाटणारा... ! म्हणून आंबा येथील सहल ही नक्कीच सर्वांगाने परिपूर्ण व अविस्मरणीय होऊन जाते...


रिसॉर्टवरील राहण्याची व्यवस्था

आंबा हे एक निसर्गाने नटलेले पर्यटन स्थळ आहे. वनविसावा फॅमिली रिसॉर्ट येथे एकाच वेळी १५० जणांची राहण्याची सुसज्ज सोय आहे. इथल्या निसर्गाचा व पर्यटनाचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे ६ ते १० लोकांचा ग्रुप आवश्यक आहे. इथे येणारे बहुतेक ग्रुप्स हे ६ ते १६ जणांचे असतात. येथील बंगलोज (एसी व नॉन एसी) ४, ६ आणि ८ बेडसमध्ये उपलब्ध आहेत तसेच एसी व नॉन एसी कॉटेजीस उपलब्ध आहेत. प्रत्येक बंगलोज मध्ये टी.वी., फ्रिज, ऍटॅच्ड बाथरुम, गरम पाणी इ. सुविधा दिल्या जातात.
वनविसावा फॅमिली रिसॉर्टच्या परिसरामध्ये लहान मुलांना प्ले एरिया,बॅडमिंटण कोर्ट, योगा हॉल, हॉर्स रायडींग, घोडागाडी सफारी, बैलगाडी सफारी याशिवाय छोटी लायब्ररी, कॅरम, बुध्दीबळ सारखे इंनडोअर गेमची व्यवस्था देखील आहे जी आपल्याला शहरी स्टार हॉटेलपेक्षाही मोठा आनंद देते.


आंबा येथील हवामान

उन्हाळयात देखील येथील वातावरण आल्हाददायक भेटते. संपूर्ण परिसर हा हरित डोंगरमाथ्यांनी व्यापलेला व पाण्याचे लहान, मोठ्या तळ्यांनी भरलेला त्यामुळे तापमान हे अतिशय सुसह्य असे. जंगल भटकंतीमुळे गर्मी वाटत असल्यास वाटेत भेटणार्‍या जलशयात डुंबण्याचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. पूर्णतः सुरक्षित या परिसरामध्ये तुम्ही निसर्गाचा आल्हाददायक आनंद घेऊन, ताजेतवान होऊन पुन्हा आपल्या आयुष्यात मार्गस्थ होऊ शकतात.रिसॉर्टवरील भोजन व्यवस्था

येथील जेवण हे ग्रामीण पद्धतीचे भाकरी, पीठलं, भरीत, हिरव्या खर्डा तसेच स्वादिष्ट बासुंदी पुरी, श्रीखंड, पुरणाची पोळी आणि कोल्हापुरी पांढरा-तांबडा रस्साचे चमचमीत मांसाहारी फ्राय मटन, चुलीवर भाजलेले चिकन. शाकाहारी, मांसाहारींकरिता वेगवेगळी जेवण व्यवस्था. पथ्य किंवा उपवासाचे मेनू पदार्थाचे जेवण आगाऊ सुचनेनुसार उपलब्ध केले जातात. नाष्टासाठी पारंपारीक ब्रेड बटर, पोहे, ऊपीट, शिर्‍या सोबत पुर्व सुचेनेनुसार ईडली, आंबोळी, थालपीठ ई. प्रकार दिले जातात.
जेवण पद्धत ही थाळी सिस्टिम व अनलिमिटेड पद्धतीची आहे. रिसॉर्टवरील जेवणाची वेळ तीन पुर्वी आणि रात्री अकरा पर्यंत अशी असते. रिसॉर्टवरील प्रशस्त डायनिंग हॉलमध्येच जेवण आणि नाश्ता उपलब्ध होतो. येथील पॅकेजमध्ये रोजचे दोन वेळचं जेवण, एक वेळ नाश्ता, तीन वेळा चहा/कॉफी/दूध अंतर्भूत आहे. इथे मासे फक्त उपलब्धतेनुसारच मिळतात.


Placess to Visit